गोविंदराव टेंबे - मराठी संगीत नाटकांच्या इतिहासातील एक उत्कृष्ठ कलाकार, संगीतकार आणि महाराष्ट्राच्या संगीत इतिहासातील सर्वोत्कृष्ठ पेटी-वादक. चंद्रिका हि जणू, शूर मी वंदिले सारख्या उत्तमोत्तम गाण्यांना त्यांनी संगीत दिले. नारायण सीताराम फडक्यांनी तर त्यांना मराठी नाट्यसंगीताचा शिल्पकार म्हटले. बालगंधर्व तर त्यांना गुरु मानायचे.
गोविंदरावांचा जन्म ५ जून १८८१ साली कोल्हापूर येथे झाला. अगदी बालवयातच ते संगीताकडे आकर्षित झाले. ते बहुतांशी स्व:शिक्षित पेटी वादक होते. गोविंदराव देवल क्लबला स्व:ताच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जडणघडणीचे श्रेय देतात. गोविंदरावांनी भास्करबुवा बखले यांच्याकडून कला आत्मसात केली. जयपूर घराण्याचे अल्लादिया ख़ाँ यांच्याकडून वास्तविक त्यांनी कधीच शिक्षा घेतली नाही पण तरीही गोविंदराव ख़ाँसाहेबांना आपला गुरु मानत.
गोविंदराव भास्करबुवा बखले यांना साथ द्यायचे आणि बहुतांशी पेटीचा एकपात्री प्रयोगहि करायचे. गोविंदरावांनी संगीत दिलेल्या संगीत मानापमान नाटकातील पदे आजही लोकप्रिय आहेत. तसेच त्यांनी अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपटालासुद्धा संगीत दिले.
१९१३ मध्ये प्रस्थापित झालेल्या गंधर्व नाटक मंडळीचे गोविंदराव काही टक्क्यांचे मालक होते. पुढे २ वर्षांनी त्यांनी स्वत:ची शिवराज नाटक मंडळी सुरु केली. त्यांनी स्वत: नाटके आणि त्यातील पदे लिहिली.
९ ऑक्टोबर, १९५५ रोजी गोविंदराव वारले. जाताना त्यांनी मागे ग्रामोफोनच्या ७८ आर.पी.एम. च्या ३० रेकॉर्ड्स ठेवल्या आहेत. त्यात त्यांचे स्वतंत्र पेटी-वादन, त्यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आहेत. गोविंदरावांनी प्रचंड लिखाणसुद्धा केले आहे. माझा संगीत व्यासंग हे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतील एक उत्कृष्ठ पुस्तक आहे.
गोविंदराव टेंबे यांच्या पदांसाठी आठवणीतील गाणी ही उत्कृष्ठ वेब-साईट पहावी.
गोविंदराव टेंबे यांच्या नाटककंपनीचे नाव ’शिवराज’ असे होते. शिवाजी नव्हे. ते उत्कृष्ठ टेनिसपटु होते व त्यानी सर्कसचे मॅनेजर म्हणूनहि काम केले होते! त्यानी बावीस श्रुति वाजवता येतील अशी पेटीहि बनवली होती. ’पटवर्धन’ हे त्यांच्या एका नाटकाचे नाव. त्यातील ’तारिणी नववसनधारिणी’ हे पद अजूनहि लोकप्रिय आहे.
ReplyDeleteसुंदर ब्लॉग आहे. मराठी नाट्यसंगीत आणि नाट्यसंस्था यांचा संपूर्ण इतिहास हा या ब्लोगवर यावा ही माझी ईच्छा आहे. आपल्या या उपक्रमास माझ्या शुभेच्छा.
ReplyDeleteAdmin
http://kmsm.co.cc